आठवणी
Published:
खरं म्हणजे माणुस हा जगलेला क्षण अणि त्याचं स्मरणात झालेल रूपांतर अश्या असंख्य भागांचा एक गुच्छा आहे. काळाच्या ओघात हे भाग पुसट होत जातात, तरी कुठल्या ना कुठल्या वास्तूत किंवा व्यक्तीत तो भाग तसाच जिवंत असतो. मग जेव्हा कधी जुन्या रस्त्यावर परत पाय पडतो, तेव्हा वाटेवरील त्या वास्तू आणि व्यक्ती दिसताच तो पुसट झालेला भाग पुन्हा पहाटेच्या शांततेत वाऱ्यासोबत हलणाऱ्या झाडाप्रमाणे फुलतो आणि जिवंत असण्याची एक वेगळीच जाणीव होऊन येते…